नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. व्याकरणिक विशेष: {चालू वर्तमानकाळ}
क्रियाव्याप्तीद्वारे क्रियेची पूर्णता, अपूर्णता, प्रगती किंवा पुनरावृत्ती दर्शविली जाते. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाने दर्शविलेली क्रिया वर्तमानकाळात काही काळासाठी घडत आहे / सुरू आहे असा बोध होत असेल तर त्यातून 'चालू वर्तमानकाळ' या क्रियाव्याप्तीचा निर्देश होतो. येथे ‘चालू’ ही संज्ञा क्रिया अपूर्ण असल्याचे दर्शविते. उदाहरणार्थ, प्रमाण मराठीतील ‘रोहन आंबा खात आहे’ या वाक्यातील ‘खात आहे’ या क्रियापदबंध संरचनेवरून खाण्याची क्रिया ही वर्तमानकाळात घडत आहे / सुरू आहे असा बोध होतो.
१.0 व्याकरणिक विशेषाची नोंदमराठीच्या बोलींमध्ये चालू वर्तमानकाळ दर्शवण्यासाठी तीन प्रकारच्या संरचना आढळल्या आहेत : (१) [क्रियापद-त(-सुसंवाद)+(सहाय्यक क्रियापद)]; (२) [क्रियापद-पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय+राह-सुसंवाद+(सहाय्यक क्रियापद)]; (३) [क्रियापद-आख्यातेतर रूप+लाग-सुसंवाद+(सहाय्यक क्रियापद)]. सापडलेल्या तिन्ही प्रकारच्या संरचनांचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत.
१.१ पर्यायी रचना १ : [क्रियापद-त(-सुसंवाद)+(सहाय्यक क्रियापद)]चालू वर्तमानकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-त(-सुसंवाद)+(सहाय्यक क्रियापद)] ही रचना राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळली.
१.१.१ उदाहरण (जि. रत्नागिरी, ता. दापोली, गाव दाभोळ, स्त्री५६, खारवी, ३री) त्या मानसाला मारतोय तो tya mansala martoy to tya mansa-la mar-toy to DEM.DIST.OBL man.OBL-ACC hit-PRS.PROG.3SGM he He is hitting that man. १.२ पर्यायी रचना २ : [क्रियापद-पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय+राह-सुसंवाद+(सहाय्यक क्रियापद)]चालू वर्तमानकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय+राह-सुसंवाद+ (सहाय्यक क्रियापद)] ही रचना राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये आढळली. या पर्यायी रचनेच्या भौगोलिक प्रसाराचा तपशील आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
चंद्रपूर | चंद्रपूर - चकनिंबाळा व दाताळा, राजुरा - कढोली (बुद्रुक) व कोष्टाळा, ब्रह्मपुरी - पांचवाव व तोरगाव (बुद्रुक) |
गडचिरोली | गडचिरोली - खुर्सा व शिवणी, कोरची - बोरी |
गोंदिया | गोंदिया - टेमनी व तेढवा, सडक अर्जुनी - डुग्गीपार व चिखली |
भंडारा | भंडारा - धारगाव व मुजबी, तुमसर - लोभी व बोरी |
नागपूर | नागपूर - येरला व सोनेगाव (लोधी), भिवापूर - सावरगाव व बोटेझरी, रामटेक - भोजापूर व करवाही, नरखेड - उमरी व पांढरी |
वर्धा | वर्धा - करंजी (भोगे) व निमगाव (सबने), आष्टी - खडका व थार, हिंगणघाट - अजंती व पोती, सेलू - वडगाव जंगली व झडशी |
यवतमाळ | घाटंजी - खापरी व कुर्ली, नेर - कोलुरा व दगड धानोरा |
अमरावती | अमरावती - सावर्डी व मलकापूर, वरूड - सातनूर व गाडेगाव, दर्यापूर - भांबोरा, जितापूर व भामोद, धारणी - कावडाझिरी |
अकोला | अकोला - गोपाळखेड व येवता |
वाशिम | वाशिम - शिरपूटी, रिसोड - चाकोळी व घोणसर, कारंजा - गिरडा व दोनद (बुद्रुक) |
बुलढाणा | बुलढाणा - पळसखेड भट व वरवंड, जळगाव-जामोद - वडगाव पाटण व निमकराड, शेगाव - शिरजगाव (निळे) व पाडसूळ |
लातूर | उदगीर - शिरोळ जानापूर व मलकापूर |
जालना | जालना - धावेडी |
औरंगाबाद | औरंगाबाद - पिंपळखुंटा, वैजापूर - नांदगाव व सावखेडगंगा, पैठण - तेलवाडी व पाचोड (बुद्रुक), सोयगाव - घोसला व पळसखेडा |
जळगाव | जळगाव - धामणगाव व वडली, जामनेर - वाकोद व वाघारी, रावेर - मांगलवाडी, चाळीसगाव - दहिवद, चोपडा - तांदळवाडी |
धुळे | धुळे - लळींग, सोनगीर, खेडे व शिरूड-खोरदड, शिरपूर - आंबे, शिंगावे व बोराडी, साक्री - दिघावे व धाडणे |
नंदुरबार | नंदुरबार - घोटाणे, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा व शहादा |
नाशिक | नाशिक - मडसांगवी, पळसे व विल्होळी, मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा.), सटाणा - मुल्हेर व दरेगाव, सुरगणा - काठीपाडा व सुरगणा, त्र्यंबकेश्वर - गोलदरी व झारवड (खुर्द), येवला - बोकटे व निमगावमढ |
अहमदनगर | अहमदनगर - कामरगाव व नारायण डोहो, नेवासा - खलालपिंपरी, अकोले - डोंगरगाव |
पालघर | जव्हार - हातेरी, मोखाडा - कारेगाव |
ठाणे | भिवंडी - भिवाली आणि खोणी |
सातारा | सातारा - चाळकेवाडी |
चालू वर्तमानकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-आख्यातेतर रूप+लाग-सुसंवाद+(सहाय्यक क्रियापद)] ही रचना राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये आढळली. या पर्यायी रचनेच्या भौगोलिक प्रसाराचा तपशील आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
यवतमाळ | घाटंजी - कुर्ली |
वाशिम | रिसोड - चाकोळी व घोणसर |
नाशिक | त्र्यंबकेश्वर - गोलदरी |
पालघर | वसई - कळंब व निर्मळ व सायवन, तलासरी - गिरगाव |
रायगड | कर्जत - साळोख, श्रीवर्धन - बागमांडला |
सिंधुदुर्ग | मालवण - कट्टा |
कोल्हापूर | करवीर - गडमुडशिंगी व खुपिरे, शाहूवाडी - शाहूवाडी, कागल - गोरंबे, केनवडे व एकोंडी, चंदगड - चंदगड व तुडीये, राधानगरी - सोन्याची शिरोली, गडहिंग्लज - हेब्बाळ जलद्याळ व इंचनाळ |
सांगली | मिरज - सोनी व म्हैसाळ, शिराळा (खुर्द) - शिराळा (खुर्द) |
सोलापूर | सोलापूर - रानमसले, डोणगाव व नांदणी, अक्कलकोट - कर्जाळ, कुरनूर व चिक्केहळ्ळी, सांगोले - हांगिर्गे, हातिद व सांगोले, बार्शी - गौडगाव व सौंदरे |
उस्मानाबाद - शिंगोली व कोंड, उमरगा - जकेकूर व कसगी | |
लातूर | लातूर - पाखरसांगवी, तांदुळजा व बाभळगाव, निलंगा - दादगी, उदगीर - शिरोळ जानापूर व मलकापूर |
नांदेड | नांदेड - लिंबगाव व पांगरी, किनवट - इस्लापूर व मारेगाव (खालचे), मुखेड - शिरूर (दबडे) व हळणी, देगलूर - खानापूर व रमतापूर |
हिंगोली | हिंगोली - कारवाडी, कळमनुरी - बाभळी व मोरवड |
जालना | मंठा - उसवद व तळणी व केंधळी |
परभणी | पालम - कापसी व बनवस, सोनपेठ - डिघोळ व तिवठणा, परभणी - टाकळगव्हाण |
बीड | बीड - बेडूकवाडी, आंबेजोगाई - सातेफळ व दरडवाडी |